इयत्ता पहिली व दुसरी अकारिक नोंदी
- विषय मराठी
- 1. लक्षपूर्वक ऐकतो.
- 2. हावभाव युक्त गायन करतो.
- 3. योग्य चढ-उतारात गायन करतो.
- 4. मित्रांची नावे सांगतो, खेळाची नावे सांगतो.
- 5. स्वतःचे नाव सांगतो.
- 6. नात्यांची नावे सांगतो, नाती ओळखतो.
- 7. अनुवाचन करतो, अक्षरांचे आकार काढतो.
- 8. अक्षरांचे आकार योग्य दिशेने काढतो.
- 9. आकार रेखाटन सराव करतो.
- 10. योग्य तऱ्हेने पेन्सिल पकडतो.
- 11. मित्रांबरोबर गप्पा मारतो.
- 12. आपले मित्र ओळखतो.
- 13. निसर्गातील आपले मित्र सांगतो.
- 14. उपयोगी प्राणी, उपयोगी पक्षी कोणते ओळखतो.
- 15. आकारांच्या योग्य जोड्या लावतो.
- 16. चित्रांची नावे सांगतो.
- 17. चित्रातील आकार ओळखतो.
- 18. अक्षर वाचन करतो, शब्द वाचन करतो.
- 19. स्वरचिन्ह ओळखतो.
- 20. अक्षरांना योग्य स्वरचिन्हे देतो.
- 21. बाराखडी चे वाचन करतो.
- 22. शब्दांचे वाचन करतो, अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवतो.
- 23. तीन शब्द असणारी वाक्य वाचन करतो.
- 24. अक्षर लेखन सराव करतो.
- 25. अक्षर वाचन, अक्षर लेखन योग्य दिशेने करतो.
- 26. सोपी वाक्य वाचन करतो.
- 27. तीन चार ओळींचा उतारा वाचन करतो.
- 28. कृतियुक्त वाक्य मधील कृती करून दाखवतो.
- 29. कृतीयुक्त वाक्यांचे वाचन करतो, त्याप्रमाणे कृती करतो.
- 30. छोटा उतारा वाचन करून समजून घेतो.
- 31. अक्षरे शब्द यांचे श्रुतलेखन करतो.
- 32. अक्षर वळणदार काढतो.
- 33. सांगितलेली कृती करतो.
- 34. एका शब्दात उत्तर देतो.
- 35. पूर्ण वाक्यात उत्तर देतो.
- 36. छोट्या कथा सांगतो.
- 37. प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
- 38. आकलनात्मक प्रश्न सोडवतो.
- 39. एखाद्या प्राण्याविषयी, पक्षाविषयी, वस्तूविषयी दोन ते तीन ओळीत माहिती सांगतो.
- 40. न अडखळता वाचन करतो.
- 41. योग्य चढ-उतारासह छोटा उतारा वाचन करतो.
- विषय गणित
- 1. आधी नंतर ओळखतो.
- 2. पुढेमागे सांगतो.
- 3. वस्तू क्रमाने लावतो.
- 4. वर-खाली ओळखतो.
- 5. चढणे-उतरणे जाणतो, त्याप्रमाणे कृती करतो.
- 6. पुढची वस्तू सांगतो, मागची वस्तू सांगतो.
- 7. कमी जास्त ओळखतो.
- 8. वस्तूंचे ढीग बनवतो.
- 9. वस्तू वेगवेगळ्या करतो.
- 10. अंकांचे आकार दाखवतो.
- 11. अंक आकार लिहितो, अंक चिन्हे ओळखतो.
- 12. वस्तू ओळखून अंक लेखन योग्य क्रमाने करतो.
- 13. एक ते पाच अंकांचे लेखन करतो.
- 14. पाच ते दहा अंकाचे लेखन करतो.
- 15. अंक वस्तू जोड्या लावतो.
- 16. अंकांचे गाणे म्हणतो.
- 17. शून्य ओळखतो, शून्य म्हणजे काय सांगतो.
- 18. 1 ते 10 संख्या वरील स्वाध्याय सोडवतो,
- 19. अंका प्रमाणे गट करण्याची कृती करतो.
- 20. संख्या वाचन करतो.
- 21. सारख्या वस्तू वेगळ्या करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतो.
- 22. दशक संख्या ओळखतो.
- 23. 1ते 100 संख्या वाचन करतो.
- 24. संख्यांचा लहान मोठेपणा सांगतो.
- 25. संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लावतो.
- 26. दोन अंकी संख्यांचे वाचन लेखन करतो.
- 27. दोन अंकी संख्यांचे श्रुतलेखन करतो.
- 28. एक अंकी संख्येची बेरीज वजाबाकी करतो.
- 29. सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवतो.
- 30. तोंडी बेरीज करतो.
- 31. उदाहरणे अचूक सोडवतो.
- 32. श्रुतलेखन अचूक करतो.
- 33. एक अंकी संख्या ओळखतो.
- 34. एक अंकी संख्यांचे अचूक लेखन वाचन करतो.
- विषय इंग्रजी
- 1. राईम्स गायन करतो.
- 2. हावभाव युक्त गायन करतो.
- 3. वापरात असलेल्या वस्तूंची इंग्रजी नावे सांगतो.
- 4. चित्राचे इंग्रजी नाव सांगतो.
- 5. A पासून Z पर्यंत अक्षर वाचन करतो.
- 6. इंग्रजी अक्षर लेखन करतो.
- 7. मोठी लिपी, लहान लिपी अक्षरे ओळखतो.
- 8. चाररेघी वही मध्ये अक्षर लेखन करतो.
- 9. यमक जुळणारे शब्द सांगतो.
- 10. वेगळ्या उच्चाराने शेवट होणारे शब्द ओळखतो.
- 11. वेगळ्या उच्चाराने सुरुवात होणारे शब्द ओळखतो.
- 12. इंग्रजी शब्दांचे अनुवाचन करतो.
- 13. इंग्रजी शब्द काळजीपूर्वक ऐकतो.
- 14. शब्द ऐकून योग्य उच्चार करतो.
- 15. अक्षरांचे अनुलेखन योग्य करतो.
- 16. समान अक्षर ओळखण्याची कृती करतो.
- 17. कमांडस ओळखतो, इंग्रजी सूचनांनुसार योग्य कृती करतो.
- 18. शरीराचे अवयव सांगतो, अवयवांची इंग्रजी नावे सांगतो.
- 19. आपल्या जवळील वस्तूंची इंग्रजी नावे सांगतो.
- 20. स्वतःचे नाव इंग्रजी मध्ये लिहितो.
- 21. चित्र वाचन करतो, ग्रीटिंग ओळखतो.
- 22. इंग्रजी मधून शुभेच्छा देतो.
- 23. इंग्रजी अक्षरांचा उच्चार योग्य प्रकारे करतो.
- 24. इंग्रजी अक्षरांचे श्रुतलेखन करतो.
- 25. इन्स्ट्रक्शन ओळखतो, त्याप्रमाणे कृती करतो.
- कला
- 1. पाटीवर आकार काढतो.
- 2. अलंकारिक आकार काढतो.
- 3. रेखाटन करतो.
- 4. रंगांची नावे सांगतो.
- 5. वाद्यांची नावे सांगतो.
- 6. चित्रात योग्य प्रकारे रंग भरतो.
- 7. मातीच्या वस्तू बनवतो.
- 8. कविता गायन करतो.
- 9. बडबड गीतांचे गायन करतो.
- 10. आवडत्या प्राण्याचा आवाज काढून दाखवतो.
- 11. पक्षांचा आवाज काढून दाखवतो.
- 12. बोधकथा सांगतो.
- 13. प्राण्यांच्या हालचाली ची कृती करतो.
- 14. अलंकारिक आकाराचे रेखाटन करतो.
- 15. फुले, पाने, पक्षी यांचे अलंकारिक आकार काढतो.
- 16. शिल्प कलेमध्ये मातीच्या सुबक वस्तू बनवतो.
- 17. नृत्य कलेमध्ये हाताचे अलंकारिक हावभाव करतो.
- 18. तालात टाळ्या वाजवतो.
- 19. योग्य तालात पायाची हालचाल करतो.
- 20. मूक अभिनय करतो.
- 21. वस्तूंचे आकार ओळखतो, विविध वस्तूंची नावे सांगतो
- 22. समूहनृत्यात सहभाग घेतो.
- कार्यानुभव
- 1. कार्यानुभव उपक्रमांमध्ये सहभाग घेतो.
- 2. वर्गात कार्यानुभव कोपरा बनवला आहेत्यामध्ये उपक्रम सादर करतो .
- 3. परिपाठात सहभाग घेतो.
- 4. पाण्याचे महत्व जाणतो.
- 5. बियांचा संग्रह करतो.
- 6. सोप्या पद्धतीने कागदाच्या घड्या घालतो.
- 7. कागद काम करतो, कागदापासून विविध वस्तू बनवतो.
- 8. बागेला पाणी देण्याच्या कृतीत सहभाग घेतो.
- 9. मैदानाची स्वच्छता करण्यात सहभाग घेतो.
- 10. वर्ग टापटीप ठेवतो.
- 11. स्वच्छतेच्या सवयी सांगतो.
- 12. दप्तर टापटीप ठेवतो, नियमित शाळेला येतो.
- 13. वर्गात वेळेत उपस्थित राहतो.
- 14. टाकाऊ वस्तु पासून विविध वस्तू बनवतो.
- 15. विविध आकारच्या पताका कापतो.
- 16. मातीच्या सुबक वस्तू बनवतो.
- 17. परस बागेची निगा ठेवतो.
- 18. बागेला पाणी देतो, पाण्याची बचत करतो.
- 19. सुईत दोरा ओवण्याची कृती करतो.
- 20. पतंग बनवतो, रिकाम्या खोक्यापासून शोभेच्या वस्तू बनवतो.
- 21. विविध वस्तूंचे कोलाजकाम बनवतो.
- 22. तिकिटे, शिंपले, रंगीत खडे यांचा संग्रह करतो.
- 23. बोधकथा सादर करतो.
- शारीरिक शिक्षण
- 1. हात फिरवणे, हात व पाय यांच्या हालचाली करतो.
- 2. चेंडू झेलने, चेंडू फेकणे इत्यादी क्रिया करतो.
- 3. जाग्यावर उड्या मारण्याचे प्रात्यक्षिक दाखवतो.
- 4. धावणे, उंच उडी, लांब उडी अशासारख्या वैयक्तिक खेळात सहभाग घेतो.
- 5. मैदानी खेळांची आवड आहे.
- 6. खेळांविषयी माहिती सांगतो.
- 7. कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळामध्ये कौशल्य दाखवतो.
- 8. वैयक्तिक खेळांमध्ये कौशल्य दाखवतो.
- 9. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतो.
- 10. योग्य प्रकारे शारीरिक हालचाली करतो.
- 11. हात आणि पायाचे व्यायाम करतो.
- 12. घरातील कष्टाची कामे करतो.
- 13. शाळेत कष्टाची कामे करतो.
- 14. द्वंद्व युक्त खेळामध्ये सहभाग घेतो.
- 15. मैदानावर खिलाडूवृत्ती दाखवतो.
- 16. मैदानी खेळात सहभाग घेतो.
- 17. योग, प्राणायाम करतो. योगाचे विविध प्रकार सादर करतो.
- 18. दोरी उड्या मारणे, लंगडी खेळणे इत्यादी खेळात सहभाग घेतो.
- 19. सहकारी खेळाडूंबरोबर मिळून मिसळून वागतो.
- 20. खेळांमध्ये सहकार्याची भावना ठेवतो.
- 21. मनोरंजक खेळात सहभाग घेतो.
- 22. मनोरंजक खेळात आवडीने सहभाग घेतो.
- 23. खेळांचे प्रकार ओळखतो बैठे खेळ खेळतो.
- 24. पोषक आहाराचे सेवन करतो.
- 25. आई- वडील, शिक्षक व मित्रांना कामात मदत करतो.
- 26. सांघिक खेळात संघनायक म्हणून योग्य निर्णय घेतो.
विशेष प्रगती
- इंग्रजी स्पेलिंग सांगतो.
- स्पेलिंग पाठांतर करतो.
- हस्ताक्षर वळणदार काढतो
- प्रकट वाचन चांगले करतो.
- मौन वाचन करतो.
- स्वतः बोधकथेच लेखन करतो.
- आपले अनुभव कथन करतो.
- अवांतर वाचन करून वर्गात सादर करतो.
- गणिती क्रिया अचूक करतो.
- तोंडी हिशेब करतो
- पाढे पाठांतर चांगले करतो.
- कूट प्रश्न सोडवतो.
- घटकावर सत्ता प्रश्न तयार करतो.
- विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतो.
- कौशल्य दाखवतो.
- वक्तृत्व चांगले आहे.
- कथाकथन करतो.
- दिलेल्या विषयावर चित्र काढतो.
- हस्ताक्षर वळणदार आहे.
- हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कौशल्य दाखवतो.
- स्पर्धा परीक्षांची तयारी चांगली.
- विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवतो.
- शिष्यवृत्तीधारक झाला आहे.
- प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये चांगल्या गुणांनी पास झाला आहे.
- सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग दर्शवतो.
- वैयक्तिक स्वच्छता उत्तम ठेवतो.
- स्वच्छतेविषयी जागरूक आहे.
- पाण्याचा काटकसरीने वापर करतो.
आवड व छंद
- आवड व छंद
- चित्रकला चांगली आहे
- गायन, वादन, नृत्य करतो.
- पोहण्याची आवड आहे.
- संग्रह वृत्ती चांगली आहे .
- सायकल चालवण्याची आवड आहे .
- धावण्याची आवड आहे .
- तबलावादन चांगले करतो .
- हार्मोनियम वादन चांगले करतो .
- हलगी वादन चांगली करतो .
- अवांतर पुस्तक वाचन करतो .
- वर्तमानपत्र संग्रह करतो .
- मातीच्या वस्तू बनवतो .
- विविध तोरणे तयार करतो .
- मंदिरात पूजा बांधतो .
- स्वच्छता करतो .
- लाकडी वस्तू बनवतो .
- खेळणी तयार करतो .
- वैज्ञानिक उपकरण तयार करतो .
- कथालेखन करतो , कविता लेखन करतो .
- कादंबरी लेखन करतो .
- तिकिटे जमवतो .
- पाळीव प्राणी पाळतो .
- प्राण्यांची निगा राखतो .
- फुलांचा संग्रह करतो .
- अलंकारिक वस्तू जमवतो .
- फिरायला जाणे पर्यटन करणे यांची आवड आहे .
- फोटो ग्राफी करतो .
- व्हिडिओ ग्राफी करतो .
- ऑनलाइन लेखन करतो .
- संगणकावर सॉफ्टवेअर तयार करतो .
- युट्युब वर व्हिडिओ तयार करतो .
- शेतीची कामे करतो .
- विविध पदार्थ बनवतो .
- कापडी पिशव्या बनवतो .
- कागदी पिशव्या बनवतो .
- बेकरीचे पदार्थ बनवतो .
- विविध खेळ खेळतो .
- संगणकावर कोडींग करतो .
- online गेम तयार करतो .
आवश्यक सुधारणा
- वेळेवर अभ्यास पूर्ण करणे.
- दिलेला अभ्यास वेळेत करणे.
- अक्षरलेखन सुधारणा करणे आवश्यक .
- अक्षर वळणदार काढणे आवश्यक.
- तोंडी प्रश्नांची उत्तरे देता येणे, चढउतारा सह वाचन करता येणे आवश्यक.
- इयत्तेनुसार इंग्रजी वाचन करता येणे आवश्यक.
- कविता गायन करता यावे .
- हावभाव युक्त वाचन करता यावे .
- करणे दररोज शाळेला यावे .
- वैयक्तिक स्वच्छता रोज ठेवणे आवश्यक .
- शाळेतील उपक्रमात सहभाग घ्यावा .
- इतरांना मदत करावी .
- झाडांची लागवड करावी .
- मौन वाचन करावे .
- दीर्घोत्तरी प्रश्न लिहिता येणे आवश्यक.
- कारणे द्या अशा प्रकारचे प्रश्न सोडवावे .
- लक्षपूर्वक ऐकावे .
- मोठ्या माणसांचा आदर करावा .
- इंग्रजी लेखन करावे .
- श्रुत लेखन अचूक करता येणे आवश्यक.
- गणिती क्रिया अचूक करता येणे आवश्यक.
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करता येणे आवश्यक.
- सारांश लेखन करता येणे आवश्यक.
- सारांश सांगता येणे आवश्यक.
- शाब्दिक उदाहरणे सोडवावीत .
- खेळ खेळात आवडीने सहभागी व्हावे .
- खेळताना सर्वांना सांभाळून घ्यावे .
- खेळाचा सराव करावा .
- वाचनाचा सराव करावा .
- नम्रतेने वागावे .
- शाळेच्या साफसफाई मध्ये सहभागी व्हावे .
- विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेणे आवश्यक .
- स्पर्धेमध्ये कौशल्य दाखवावे .
- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा .
व्यक्तिमत्व गुण विकास
- शांत आहे.
- स्थिर आहे.
- सर्वांशी मिसळून वागतो.
- मनमिळावू स्वभाव.
- नम्र स्वभाव आहे .
- सर्वांशी प्रेमाने वागतो.
- सर्वांना मदत करतो.
- खेळात खेळकर वृत्ती दाखवतो.
- अभ्यासू आहे.
- चिकाटीने अभ्यास करतो.
- जिज्ञासू आहे.
- एखादे काम जिद्दीने पूर्ण करतो.
- नेतृत्व गुण आहे.
- समूहाचे नेतृत्व करतो.
- सर्वांना सांभाळून घेतो.
- सर्व उपक्रमात सहभागी होतो.
- प्रामाणिक आहे.
- प्रेमळ आहे.
- आज्ञाधारक आहे.
- मनमिळावू आहे.
- प्रज्ञावान आहे.
- बोलका आहे.
- अबोल असतो.
- सहकार्य वृत्ती चांगली.
- खिलाडू वृत्ती दिसून येते.
- सौजन्यशील आहे.
- हजरजबाबी आहे.
- थोडा चिडखोर स्वभाव दिसतो.
- भूतदया दाखवतो.
- प्राण्यांच्यावर प्रेम करतो.
- थोडा अस्थिर आहे.
- स्थिर आहे.
- कार्यतत्पर आहे.
- सहकार्य वृत्ती चांगली.
- थोडासा बुजरा दिसून येतो.
- उत्साही आहे.
- चंचल आहे.
No comments:
Post a Comment
Thanks lot for your loveable comment plz follow and share