शब्दयुवा Education
शैक्षणिक माहिती असणारा सुंदर ब्लॉग
Tuesday, 18 August 2026
Monday, 17 August 2026
A to Z Familiar words
रोजच्या वापरातील शब्दांचा संग्रह. अगदी सोप्या पद्धतीने आणि मोठ्या font मध्ये लिहिला आहे जरूर पहा, वाचा आणि प्रिंट काढून घेऊ शकता
डाऊनलोड करण्या साठी येथे क्लिक करा 👉 download
Thursday, 8 January 2026
७ वी शिष्यवृत्ती सराव चाचणी
मटकरी युवा मंच कागल यांच्यामार्फत घेण्यात आलेली ७ वी शिष्यवृत्ती सराव चाचणी
मराठी गणित प्रश्नपत्रिका 👉 DOWNLOAD उत्तरपत्रिका 👉 DOWNLOAD
इंग्रजी बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका 👉 DOWNLOAD उत्तरपत्रिका 👉 DOWNLOAD
4 थी शिष्यवृत्ती सराव चाचणी
श्री मटकरी युवा मंच कागल यांच्या सौजन्याने घेण्यात आलेली ४ थी शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र १
Tuesday, 10 June 2025
Tuesday, 3 June 2025
matta dayitv मत्ता दायित्व pdf
दर वर्षाच्या मार्च महिन्यात प्रत्येक शासकीय व्यक्ती ला भरून द्यावाच लागणारा मत्ता दायित्व Form.
Wednesday, 28 May 2025
Sunday, 4 May 2025
बारावी निकाल HSC Result 2025
दि. 5/5/2025 रोजी बारावी निकाल 1 च्या पुढे खालील लिंक ला क्लिक करून पाहू शकता 👇👇
https://hscresult.mahahsscboard.in/
Friday, 1 November 2024
धूळ पेरणी इयत्ता ४ थी
धूळ पेरणी इयत्ता ४ थी
स्वाध्याय
प्रश्न
१) एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ)
कोणाचा जीव झुरणीला
लागला?
उत्तर –
मातीचा जीव झुरणीला लागला आहे.
आ)
धरणीला कशाचा ध्यास आहे?
उत्तर –
धरणीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या पिकांचा ध्यास लागला आहे.
इ)
कोणते दिवस येऊ नयेत असे
कवीला वाटते?
उत्तर – जाचक
दिवस म्हणजेच दुष्काळाचे दिवस येऊ नयेत असे काविला वाटते.
प्रश्न
२) थोडक्यात उत्तरे लिहा.
अ)
कोरडे नक्षत्र गेल्यावर
शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील?
उत्तर - शेतकऱ्याने पेरणी केल्यानंतर जर नक्षत्र कोरडे गेले
तर आपले पिक येईल का? त्याला पाणी मिळेल का? पाणी नाही मिळाले तर शेत पिकणार नाही,
जनावरांना चारा मिळणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. हे असे अनेक विचार त्याच्या मनात
येतील.
आ)
शेतकऱ्याच्या शेतात भरपूर
पिक आले तर, त्याच्या मनात कोणते विचार येतील?
उत्तर –
रानातील भरपूर पिक पाहून शेतकऱ्याचे मन आनंदाने भरून जाईल. सर्वांना पोटभर अन्न मिळेल धन्याच्या राशी पडतील त्यातून पैसे मिळतील
आणि घरातील सर्वांना नवनवीन वस्तू घेता येतील. असे विचार त्याच्या मनात येतील.
इ)
पाऊस पडला नाहीतर काय
होईल असे तुम्हाला वाटते?
उत्तर – पाऊस
नाही पडला तर जमिनीला पिकांना पाणी मिळणार नाही. पिके उगवून येणार नाही खायला अन्न
मिळणार नाही. जनावरे, माणसे उपाशी मरू लागतील. दुष्काळ पडेल पिण्यासाठी सुद्धा पाणी
मिळणार नाही.
प्रश
३) ओळी पूर्ण करा.
अ) असो बरकत (इ) कासावीस डोळे
धूळ पेरणीला बनले
चातक
आ) टिपूर मोत्यांची (ई)
मिळता डोळ्यांना
आस मोरणीला मेघुट
इशारे
प्रश्न
४) खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
(अ)
हिरव्या पिसांचा
ध्यास धरणीला
अर्थ – विविध
पक्षांना पिसे असतात त्या पिसांमुळे पक्षांचे सौंदर्य खुलून दिसते, ते मनमोहक वाटतात.
अगदी तसीच मनमोहक हिरवी पिसे म्हणजेच हिरवे पिक आपल्या कुशीतून उगवून यावे असा ध्यास
धरणीला म्हणजे जमिनीला लागला आहे.
(आ)
मातीच्या कणाला
फुटले धुमारे.
अर्थ – पाऊस
पडल्यानंतर जीमिनीत पेरलेल्या बियांना अंकुर फुटू ते अंकुर जमिनीतून वर आल्या नंतर
जणू जमिनीतून धुमारे फुटलेत असे वाटत आहे.
प्रश्न
५) पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला, की शेतकर्यांना दिवस जाचक म्हणजेच त्रासाचे वाटू
लागतात परिसरातील खालील व्यक्तीना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी त्यांच्याशी
चर्चा करून लिहा.
अ) बांधकामावर काम करणारे मजूर
बरेच दिवस बांधकामाचे
काम नाही मिळाले तर ते दिवस जाचक वाटणार आहेत.
आ)
आई वडील
मुलगा किंवा मुलगी शाळा
शिकण्यासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेल्यानंतरचे दिवस आई वडिलांना जाचक वाटणार आहेत.
इ)
उसतोडणी कामगार
साखर कारखाने बंद असणारे
दिवस यांना जाचक वाटणार आहेत.
ई) शिक्षक
शैक्षणिक काम सोडून इतर
कामे जसे कि निवडणूक कामकाज , मतदार नोंदणी कामकाज अशी अशैक्षणिक कामे असणारे दिवस
शिक्षकांना जाचक वाटणार आहेत.
उ)
शाळेबाहेर खाऊ विकणारे
शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्या नंतर चे
दिवस यांना जाचक वाटणार आहेत.
प्रश्न
६) ही कविता धूळपेरणीची आहे. या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही
तर त्याला शेती करता येणार नाही. या उलट काही लोकांना खूप पाऊस आला, तर काम /
व्यवसाय करता येणार नाही. आशा लोकांची माहिती घ्या. उदा. , रस्त्याच्या कडेला बसून भाजी
विकणारे.
रस्ता बांधकाम
करणारे मजूर
विटा बनवणारे
कामगार
रस्त्याच्या कडेला
फळे पेपर विकणारे.
माती पासून वस्तू
बनवणारे कारागीर.
Saturday, 28 September 2024
महात्मा गांधी भाषण
राष्ट्रपिता महात्मा गांधी
विविध प्रांत, भाषा, वर्ण, वंश यांनी नटलेल्या भारत देशावर सुमारे साडेतीनशे वर्षे इंग्रजांनी जुलमी राज्य केले. आपल्या भारतभूमीला गुलाम बनवले. याच्या विरोधात मोठ्या हिमतीने आव्हान जर कोणी दिले असेल तर; ते होते भारताचे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी.
आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात काठी आणि बंदुकीचा वापर नाही केला. त्यांनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तीन तत्वांचा अवलंब केला. यांच्या जोरावरच त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींना माहित होते इंग्रजांच्या शस्त्रा पुढे निशस्त्र शेतकऱ्यांचा कधीच टिकाव लागणार नाही. यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर त्यांना व त्यांच्या धोरणांना विरोधच केला पाहिजे, म्हणून त्यांनी सत्याग्रह आणि असहकाराची आंदोलने उभी केली.
त्यांनी केलेला सगळ्यात पहिला सत्याग्रह म्हणजेच चंपारण व खेडा सत्याग्रह. त्याकाळी इंग्रज... शेतकऱ्यांवर जबरदस्तीने कर आकारणी करत असत. इंग्रज जे सांगतील तेच पीक शेतकऱ्यांनी पिकवायचे असा दंडक असायचा. या जाचाला शेतकरी कंटाळले होते. त्यातच दुष्काळ आणि अवर्षण याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते. अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. यातून या जाचातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी कंबर कसली. चंपारण व खेडा येथे निळ पिकवण्याच्या अन्यायकारी निर्णयाविरोधात पहिला सत्याग्रह घडवून आणला. सर्व शेतकऱ्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देऊन निळ पिकवण्यावर बहिष्कार घातला. शेतकऱ्यांची ही एकी पाहून इंग्रजांनी आपली सक्ती मागे घेतली. इथून पुढे गांधीजींनी हेच आपले समाजसेवेचे व लोक हिताचे कर्तव्य मानून, शास्त्र समजून देश सेवेसाठी सर्वस्व वेचले अशा या महात्म्यास माझा शतशः प्रणाम....
