Friday, 1 November 2024

धूळ पेरणी इयत्ता ४ थी

 

धूळ पेरणी इयत्ता ४ थी

स्वाध्याय

प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ)   कोणाचा जीव झुरणीला लागला?

उत्तर – मातीचा जीव झुरणीला लागला आहे.

आ)  धरणीला कशाचा ध्यास आहे?

उत्तर – धरणीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या पिकांचा ध्यास लागला आहे.

इ)    कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते?

उत्तर – जाचक दिवस म्हणजेच दुष्काळाचे दिवस येऊ नयेत असे काविला वाटते.

प्रश्न २) थोडक्यात उत्तरे लिहा.

अ)   कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील?

उत्तर -  शेतकऱ्याने पेरणी केल्यानंतर जर नक्षत्र कोरडे गेले तर आपले पिक येईल का? त्याला पाणी मिळेल का? पाणी नाही मिळाले तर शेत पिकणार नाही, जनावरांना चारा मिळणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. हे असे अनेक विचार त्याच्या मनात येतील.

आ)  शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पिक आले तर, त्याच्या मनात कोणते विचार येतील?

उत्तर – रानातील भरपूर पिक पाहून शेतकऱ्याचे मन आनंदाने भरून जाईल. सर्वांना पोटभर  अन्न मिळेल धन्याच्या राशी पडतील त्यातून पैसे मिळतील आणि घरातील सर्वांना नवनवीन वस्तू घेता येतील. असे विचार त्याच्या मनात येतील.

इ)    पाऊस पडला नाहीतर काय होईल असे तुम्हाला वाटते?

उत्तर – पाऊस नाही पडला तर जमिनीला पिकांना पाणी मिळणार नाही. पिके उगवून येणार नाही खायला अन्न मिळणार नाही. जनावरे, माणसे उपाशी मरू लागतील. दुष्काळ पडेल पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही.

प्रश ३) ओळी पूर्ण करा.

अ)   असो बरकत                                                       (इ) कासावीस डोळे

धूळ पेरणीला                                                            बनले चातक

आ)  टिपूर मोत्यांची                                                     (ई) मिळता डोळ्यांना

आस मोरणीला                                                          मेघुट इशारे

 

 

प्रश्न ४) खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.

(अ) हिरव्या पिसांचा

ध्यास धरणीला

अर्थ – विविध पक्षांना पिसे असतात त्या पिसांमुळे पक्षांचे सौंदर्य खुलून दिसते, ते मनमोहक वाटतात. अगदी तसीच मनमोहक हिरवी पिसे म्हणजेच हिरवे पिक आपल्या कुशीतून उगवून यावे असा ध्यास धरणीला म्हणजे जमिनीला लागला आहे.

(आ)               मातीच्या कणाला

फुटले धुमारे.

अर्थ – पाऊस पडल्यानंतर जीमिनीत पेरलेल्या बियांना अंकुर फुटू ते अंकुर जमिनीतून वर आल्या नंतर जणू जमिनीतून धुमारे फुटलेत असे वाटत आहे.

प्रश्न ५) पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला, की शेतकर्यांना दिवस जाचक म्हणजेच त्रासाचे वाटू लागतात परिसरातील खालील व्यक्तीना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी त्यांच्याशी चर्चा करून लिहा.

अ)   बांधकामावर काम करणारे मजूर

बरेच दिवस बांधकामाचे काम नाही मिळाले तर ते दिवस जाचक वाटणार आहेत.

आ)  आई वडील

मुलगा किंवा मुलगी शाळा शिकण्यासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेल्यानंतरचे दिवस आई वडिलांना जाचक वाटणार आहेत.

इ)    उसतोडणी कामगार

साखर कारखाने बंद असणारे दिवस यांना जाचक वाटणार आहेत.

ई)    शिक्षक

शैक्षणिक काम सोडून इतर कामे जसे कि निवडणूक कामकाज , मतदार नोंदणी कामकाज अशी अशैक्षणिक कामे असणारे दिवस शिक्षकांना जाचक वाटणार आहेत.

उ)    शाळेबाहेर खाऊ विकणारे

शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्या नंतर चे दिवस यांना जाचक वाटणार आहेत.

प्रश्न ६) ही कविता धूळपेरणीची आहे. या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर त्याला शेती करता येणार नाही. या उलट काही लोकांना खूप पाऊस आला, तर काम / व्यवसाय करता येणार नाही. आशा लोकांची माहिती घ्या. उदा. , रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारे.

रस्ता बांधकाम करणारे मजूर

विटा बनवणारे कामगार

रस्त्याच्या कडेला फळे पेपर विकणारे.

माती पासून वस्तू बनवणारे कारागीर.

No comments:

Post a Comment

Thanks lot for your loveable comment plz follow and share