एकविसाव्या शतकातील सामाजिक क्रांतीच्या उंबरठ्यावरील जग...
-पृथ्वीराज भारमल B.Tech
नुकतंच म्यानमार मध्ये लष्करानं बंड केलं आणि सत्ताधारी NLD(National league for democracy) च्या नेत्या आँग सान सूची यांना कैद केलं आणि एका वर्षाची आणीबाणी जाहीर करत देशाची सूत्र आपल्या हातात घेतली. शांत आणि मितभाषी असणाऱ्या जनरल मिन आँग व्हेंग यांनी हे बंड घडवून आणले. तशी लष्करी सत्ता म्यानमार वासीयांना काय नवीन नाही २०११ पर्यँत म्यानमार मध्ये लष्करी शासन होत. त्यानंतर देशात लोकशाहीची मागणी जोर धरू लागली व नोबेल विजेत्या सूची यांनी लोकांचं नेतृत्व करत लोकशाही साठी पुढाकार घेतला नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत NLD ला मोठं यश मिळालं आणि लष्करी पाठींबा असलेल्या पक्षाला हार पत्करावी लागली. मतमोजणीत फेरफार झाल्याचं कारण सांगत लष्करान हा विजय मान्य केला नाही पण देशातील नागरिकांनी सूची यांना पाठींबा दिल्याने लष्कराला काय करता आले नाही, पण आता मतमोजणीचा मुद्दा काढून NLD च्या सर्व नेत्यांना अटक करून लोकांवर अन्यायी आणीबाणी लादली. ह्या सर्व गोष्टीचा म्यानमार मध्ये तीव्र निषेध होत आहे आणि मोठ्या आंदोलनाची तयारी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. दुसरी गोष्ट चीनमध्ये शी जिंग पिन यांनी आपली सत्ता प्रबळ आणि दीर्घकाळ राहण्यासाठी केलेले प्रयन्त असो किंवा उत्तर कोरिया मधील हुकूमशाही हे सर्व तेथील नागरीकांच्या विरोधात आहेत .
हे झालं दक्षिण, पूर्व आशियातील प्रकरन पण युरोपात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांकडून बंड किंवा प्रस्थापित शासन कर्त्यां विरोध लोक रस्त्यावर उतरत आहेत मॉस्कोतील कोर्टाने अलेक्सि नावलीनी यांना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. नवालीनी व्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्यासोबत पुतीन यांच्या अजून काही विरोधकांना अटक केली आहे. जर्मनीतील विमानतळावर नवालीनी यांच्यावर जीवघेणा विष हल्ला झाला याचे सूत्रधार पुतीन आहेत असे ते सांगतात आता नवालीनी यांच्यासाठी रशियाची राजधानी मॉस्को येथे हिंसक आंदोलन सुरु झाले आहे. यावरून दिसते की पुतीन यांनी घटनेत बदल करून दीर्घ काळ राष्ट्राध्यक्ष बनण्याचा डाव नागरिकांना रुचलेला नाही.
अशाच प्रकारे, अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत झालेली हिंसा. ते कृत्य करणारे लोक जरी सर्व नागरिक नसले तरी एवढा मोठा लोकांचा वर्ग त्या कृत्यात सहभाग घेतो हि गोष्ट underline करण्यासारखी आहे. तसेच भारतात शेतकरी आंदोलन असेल आणि प्रस्थापित केंद्र सरकारच्या विरोधात असणार देशातील मोठा वर्ग . ह्या सर्व बाबी लक्षात घेता असे दिसुन येते की जगात प्रस्थापित सत्ताधरांच्या विरोधात आंदोलने होत आहेत ह्या वरून असे दिसते, की एकविसाव्या शतकातील सामाजिक क्रांतीचा पाया घातला जातोय आणि जग उद्याच्या सामाजिक क्रांतीला आणि राजकीय बदलांना सामोरे जाईल असे वाटते पण हे सर्व येणार भविष्य काळच सांगू शकेल..
मस्त..
ReplyDeletekeep it up mama