इयत्ता 1 ली ते 7 वी सोप्या सुटसुटीत नोंदी
मराठी
- कवितेमधील विविध अर्थ समजून घेतो, माहिती सांगतो.
- शब्दांच्या कोड्यावरून वेगवेगळे शब्द तयार करतो.
- शब्दांची अंताक्षरी बरोबर सांगतो.
- वर्तमानपत्रातील विविध बातम्या वाचन करतो, बातम्यांची कात्रणे ठेवतो.
- आसपास घडणाऱ्या बातम्यांचे लेखन करतो.
- बातमीचे शीर्षक सांगतो, बोली भाषेत असणाऱ्या शब्दांचे शब्दांचे अर्थ प्रमाण भाषेत सांगतो.
- पाठावर आधारित नाटिकांमध्ये भाग घेतो.
- एकपात्री नाटक सादर करतो.
- आपल्यासाठी उपयुक्त प्राण्यांची माहिती सांगतो.
- पाठावर आधारित कारणे द्या यासारख्या प्रश्नांची उत्तरे लिहितो.
- समुहदर्शक शब्द सांगतो, विविध प्राण्यांचे आवाज काढतो.
- पाठावर आधारित स्वतःच्या शब्दात गोष्ट सांगतो, पाळीव प्राणी कोणते ते सांगतो.
- संवादात भाग घेतो, पाठावर आधारित समूहदर्शक शब्द सांगतो.
- वाक्प्रचार व त्यांचे अर्थ सांगतो. वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करतो.
- विविध झाडांचे पाने आपल्या संग्रही ठेवतो. पानांचे आकार ओळखतो.
- लिहिण्याचे फायदे जाणतो छोट्या गोष्टी लेखन करतो.
- एखाद्या विषयाविषयी स्वतः लेखन करतो.
- बोधकथा लेखन करतो, बोधकथा सांगून कथेचा बोध सांगतो.
- पाठाचे प्रकट वाचन करतो.
- आपल्या शाळेतील समारंभाचे वर्णन करून सांगतो.
- शाळेतील समारंभाची माहिती लेखन करतो.
- शाळेतील परिपाठामध्ये सहभाग घेतो.
- प्रार्थना गायन करतो.
- बातम्यांचे वाचन करतो.
- बातम्या लेखन करतो, बातम्या संग्रह या उपक्रमात सहभाग घेतो.
- बातम्यांची कात्रणे संग्रहित करून ठेवतो.
- हुतात्मा या शब्दाचा अर्थ सांगतो.
- आपले राष्ट्रीय सण सांगतो, त्याबद्दल माहिती वर्णन करतो.
- सैनिकांच्या विषयी माहिती सांगतो.
- सैनिकांच्या विषयी आदर बाळगतो.
- आपल्या ध्वजाचे वर्णन करून सांगतो.
- म्हणी पाठांतर करतो.
- विविध म्हणींचे अर्थ सांगतो, पाठाचे मौन वाचन करतो.
- वाचन करून प्रश्नांची तोंडी उत्तरे देतो.
- मोठ्या शब्दात लपलेले शब्द शोधतो.
- धान्याचे नमुने गोळा करण्याची कृती करतो.
- मराठी शब्द शब्दकोशानुसार लिहितो.
- शब्दकोशाचे वाचन करतो.
- विविध शब्दांचा संग्रह करतो, शब्दकोशामधील शब्दांचा क्रम सांगतो.
- अपूर्ण गोष्टी विचार करून पूर्ण करतो.
- संत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती सांगतो.
- गाडगे बाबांचे चित्र रेखाटन करतो.
- गाडगे बाबांनी केलेल्या कार्याची माहिती सांगतो.
- पर्यटन स्थळांना भेटी देतो.
- ग्रामीण शब्दांचा अर्थ शोधतो. विविध ग्रामीण शब्द संग्रह करून ठेवतो.
- सुट्टीचा सदुपयोग कसा करावा याविषयी सांगतो.
- सुट्टीमध्ये विविध उपक्रम करतो.
- आपल्या भारतीय सणांविषयी माहिती सांगतो.
- सणांचे महत्त्व लेखन करतो.
- इतर धार्मिक सणांचे महत्त्व सांगतो.
- इतर धर्माचा आदर करतो.
- आपल्या गावातील शहरातील फलक वाचन करतो.
- सूचनाफलक लेखन करतो, शाळेमध्ये विविध फलक तयार करतो.
- शाळेतील घोषणा फलक वाचून दाखवतो.
- सामान्य ज्ञान विषयक फलकांचे लेखन करतो.
- कवितेच्या ओळी पूर्ण करतो.
- रिकाम्या जागा भरा असे प्रश्न सोडवतो.
- वृक्ष आपले मित्र कसे ते सांगतो.
- आपल्या भारतीय संशोधकांची माहिती आहे.
- संशोधकांची माहिती लेखन करतो.
- भारतीय संशोधकांची नावे सांगतो.
- चित्रावर प्रकल्प सादर करतो.
- रस्त्यावरील दिव्यांची ओळख आहे.
इंग्रजी
- Rhymes पाठांतर आहेत.
- चित्रावरून शब्द सांगतो, शब्दांचे स्पेलिंग सांगतो.
- स्वतः विषयी इंग्रजी मध्ये माहिती सांगतो.
- इंग्रजी शब्द वाचन करतो.
- इंग्रजी उच्चार ओळखतो.
- शब्दातील सांगितलेल्या अक्षराला उच्चारावरून गोल करतो.
- परिचित इंग्रजी शब्दांचे वाचन करतो.
- इंग्रजी अक्षरांची ओळख आहे.
- इंग्रजी अक्षरे वाचन करतो.
- इंग्रजी अक्षरांमध्ये लहान मोठी लिपी ओळखतो.
- चार रेघांमध्ये लहान लिपीचे लेखन योग्य करतो.
- इंग्रजी अक्षरांचे योग्य क्रमाने लेखन करतो.
- गावातील इंग्रजी पाट्यांचे वाचन करतो.
- इंग्रजी अक्षरात स्वतःचे नाव लिहितो.
- विविध फुलांची, विविध धान्याची इंग्रजी नावे सांगतो.
- वर्गातील वस्तूंची इंग्रजी नावे सांगतो.
- छोट्या इंग्रजी प्रश्नांची उत्तरे अचूक देतो.
- इंग्रजी शब्द मातृभाषेत सांगतो.
- Stand up सारख्या commands ओळखतो
- rhyme गायन करतो.
- आठवड्याचे वार इंग्रजीत सांगतो.
- छोट्या छोट्या इंग्रजी skit चे वाचन करतो.
- भाज्यांची इंग्रजी नावे लेखन वाचन करतो.
- Wh type यासारखे प्रश्न सोडवतो, तोंडी उत्तरे देतो.
- विविध english action ओळखतो.
- String of action सादर करतो.
- a, i ,e O u पासून सुरू होणारे शब्द वाचन करतो.
- समान उच्चार असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावतो.
- Instruction ओळखतो त्याप्रमाणे कृती करतो
- Priposition चा वाक्यात उपयोग करतो
- Articale ओळखतो उपयोग करतो, त्यांचा वाक्यात उपयोग करतो.
- विविध अक्षरांची इंग्रजी अंताक्षरी वाचन करतो.
- Singular plural शब्द ओळखतो.
- छोट्या इंग्रजी वाक्यांचे वाचन करतो.
- Rhyming word सांगतो लेखन करतो.
- Action time मध्ये दिलेल्या कृती योग्य करतो.
- Word and puzzles यावर आधारित स्वाध्याय अचूक सोडवतो.
- चित्रांची नावे inglish मध्ये संगतो
- All alphaabet song ही rhyme गायन करतो.
- Opposite शब्द वाचन करतो.
- इंग्रजी शब्द ऐकून पाहिले इंग्रजी अक्षर ओळखतो.
- Capital letters व small letters जोड्या लावतो.
- अक्षर कार्ड दाखवल्यास अक्षर वाचन करतो.
- दिलेले अक्षर कार्ड शोधतो.
- Action word वाचून त्याप्रमाणे कृती करतो.
- To sun and wind या पाठाचे वाचन करतो.
- Mottos ओळखतो, वाक्यात उपयोग करतो..
- Mottos चा अर्थ मातृभाषेत सांगतो.
- विविध ठिकाणे इंग्रजी मॅप मध्ये दाखवतो.
- दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग सांगतो.
- इंग्रजी शब्दांचे अनुलेखन करतो.
- प्राणी, पक्षी, फळे, फुले यांची इंग्रजी नावे वाचन व पाठांतर करतो.
- अपूर्ण इंग्रजी वाक्य पूर्ण करतो.
- Messages यावर आधारित स्वाध्याय सोडवतो.
- Guess the word सारखे उपक्रम कृती मध्ये भाग घेतो.
- Related word सांगतो.
- इंग्रजी गोष्टी वाचन सराव करतो.
- Faces and feelings ओळखतो.
- छोट्या छोट्या इंग्रजी संभाषणात भाग घेतो.
गणित
- भौमितिक आकारांची नावे सांगतो.
- आयत, चौरस, वर्तुळ, त्रिकोण यांचे आकार काढतो.
- त्रिमिती वस्तूंचे कडा, कोपरे सांगतो.
- वस्तू व आकार यांची तुलना करतो.
- घरातील विविध वस्तूंचे आकार सांगतो.
- भौमितिक आकारांचा रेखाटन यावर उपक्रम करतो.
- आयत काढण्याची कृती दाखवतो.
- चौरस म्हणजे काय हे सांगतो.
- चौरसाची व्याख्या सांगतो.
- तीन अंकी संख्या अंकात अक्षरात लेखन करतो.
- दशक संख्या व शतक संख्या यामध्ये फरक सांगतो.
- शतक संख्या म्हणजे काय हे सांगतो.
- एकक, दशक, शतक यानुसार अब्जापर्यंत संख्या लेखन करतो.
- तीन अंकी संख्येमधील अंकाची स्थानिक किंमत सांगतो.
- दर्शनी किंमत म्हणजे काय सांगतो.
- श्रुतलेखनाने संख्या लेखन अचूक करतो.
- संख्येचे अनुलेखन चांगले करतो.
- तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप सांगतो.
- विस्तारित रूपाचे लेखन करतो.
- विस्तारित रूपावरून संख्या सांगतो.
- संख्या लेखन करतो तीन अंकी संख्येची बिन हातच्याची बेरीज करतो.
- शाब्दिक उदाहरणे सोडवतो.
- हातच्याची वजाबाकी, हातच्याची बेरीज अशी गणिते करतो.
- दोन अंकी संख्येचा गुणाकार करतो, गुणाकाराची क्रिया स्पष्ट करतो.
- गुणक म्हणजे काय सांगतो. गुण्य म्हणजे काय सांगतो.
- शाब्दिक उदाहरणे अचूक सोडवतो.
- वजाबाकी मध्ये उसना घेण्याची पद्धत दाखवतो.
- संख्या लहान मोठी ओळखतो.
- पेक्षा मोठे, पेक्षा लहान, बरोबर या चिन्हांचा अचूक उपयोग करतो.
- शतक संख्येवरून संख्येचा लहान मोठेपणा ठरवतो.
- आधीची संख्या मागची संख्या लिहितो.
- संख्येचा चढता क्रम अचूक सांगतो.
- उतरता क्रम अचूक लिहितो.
- दिलेल्या अंकांपासून तीन अंकी संख्या तयार करतो.
- तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगतो.
- तीन अंकी लहानात लहान संख्या ओळखतो.
- संख्या कार्डावरील संख्यांचे अचूक वाचन करतो.
- संख्या कार्डे हाताळण्याची कृती अचूक करतो.
- दिलेल्या संख्येइतकी दिलेल्या संख्येचे कार्ड शोधण्याची कृती योग्य करतो.
- दोन ते दहा पाढे पाठांतर करतो.
- अपूर्ण पाढा पूर्ण करतो, गुणाकाराची व्याख्या सांगतो.
- नाणी ओळखतो नाणी आणि नोटा यांच्यावर स्वाध्याय सोडवतो.
- दिलेल्या वस्तूचे मापन योग्य करतो.
- लांबी मोजण्याचे एकक ओळखतो.
- धारकता म्हणजे काय ते सांगतो.
- वस्तुमान म्हणजे काय आणि त्याचे एकक सांगतो.
- दुकानातून वस्तू अचूक आणतो.
- किलोमीटर, सेंटीमीटर यांचे परस्पर रूपांतर करतो.
- किलोलीटर, लिटर यांचे परस्पर रूपांतर करतो.
- अर्धा लिटर, पाव लिटर, पाऊन लिटर ओळखतो.
- आकारमान म्हणजे काय.
- आकृतीबंधावर आधारित व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे सोडवतो.
- सममिती म्हणजे काय सांगतो.
- सममित आकार ओळखतो.
- सममिती वरील उदाहरणे सोडवतो.
- हातच्याची बेरीज योग्य करतो.
- हातच्याची वजाबाकी अचूक सोडवतो.
- शाब्दिक उदाहरणांचे वाचन करून योग्य उत्तर लिहितो.
- नोटा व नाणी यांचे परस्पर रूपांतर करतो.
- नाणी व नोटा यावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.
- गुणाकार भागाकार यावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.
- भागाकार म्हणजे काय सांगतो.
- भाज्य म्हणजे काय सांगतो, भाज्य ओळखतो.
- भाजक ओळखतो.
- भागाकार करण्यासाठी वस्तूंचे योग्य भाग तयार करतो.
- घड्याळाचे वाचन करतो.
- कालमापन ओळखतो, दिनदर्शीका ओळखतो.
- तारीख व्यवस्थित सांगता येते.
- घड्याळात किती वाजले ते ओळखतो.
- अपूर्णांक ओळखतो, अर्धा, पाव, पाऊन ओळखतो.
- अपूर्णांकावरील उदाहरणे सोडवतो.
- अपूर्णांकाचे योग्य वाचन करतो.
- एखाद्या वस्तूला दिलेले प्रमाण ओळखतो.
परिसर अभ्यास
- आपल्या अवतीभवती असणाऱ्या प्राणी, पक्षी, वनस्पती, विविध वस्तू इत्यादींची नावे सांगतो.
- सजीव म्हणजे काय सांगतो.
- सजीव निर्जीव ओळखतो.
- परिसरातील निर्जीव वस्तूंची यादी करतो.
- आपल्याला उपयोगी प्राण्यांची माहिती सांगतो.
- लोकरीचे उपयोग सांगतो.
- कापूस पिकाचे महत्त्व सांगतो.
- कापसापासून कोणकोणत्या वस्तू तयार करतात हे वर्णन करतो.
- प्राण्यांचे आकार ओळखतो.
- आकारावरून प्राणी सांगतो.
- प्राण्यांचे प्रकार ओळखतो.
- दूध देणारे प्राणी अंडी देणारे प्राणी ओळखतो.
- आपल्याला उपयोगी पाळीव प्राणी कोणते ते सांगतो.
- आपल्याला त्रासदायक प्राणी कोणते आहेत त्यांची नावे सांगतो, त्यावर उपाय शोधतो.
- प्राण्यांच्या पिल्लांची नावे सांगतो.
- कोण कोठे राहतो, याविषयी माहिती सांगतो.
- मासा प्राण्याविषयी माहिती लेखन करतो.
- अंडी देणारे प्राणी त्यांची नावे सांगतो.
- सरपटणारे प्राणी कोणते त्यांची माहिती सांगतो.
- फुलपाखरांचे विविध प्रकार सांगतो.
- कीटक म्हणजे काय? याचे वर्णन करतो.
- निवारा म्हणजे काय? ते सांगतो.
- विविध प्राण्यांचे निवारे सांगतो.
- मुख्य दिशा ओळखतो, नकाशामध्ये दिशा दाखवतो.
- नकाशा वाचन चांगले करतो.
- नकाशात विविध ठिकाणी दाखवतो.
- सूर्य उगवतो ती दिशा सांगतो.
- आपल्या जिल्ह्याचा व राज्याचा नकाशा ओळखतो.
- काळ कसा मोजतात याविषयी माहिती देतो.
- काळाच्या काळ मोजण्याची विविध साधने कोणती ते सांगतो.
- आपला गाव कसा आहे याविषयी माहिती सांगतो.
- गावात कोणते व्यवसाय केले जातात यांची माहिती सांगतो.
- शेतीची माहिती सांगतो, शेतीसाठी उपयोगी वस्तू सांगतो.
- गावात वाहतुकीची साधने कोणती असतात ते सांगतो.
- आठवडी बाजार म्हणजे काय ओळखतो.
- आपल्या जवळ असणाऱ्या शहराचे नाव सांगतो.
- शहरातील विविध वस्तूंची नावे सांगतो.
- शहरातून गावाकडे व गावाकडून शहराकडे येणाऱ्या वस्तूंची यादी करतो.
- आपल्या पाण्याची गरज ओळखतो.
- पाण्यामध्ये विविध पदार्थ विरघळतात, याचा प्रयोग दाखवतो.
- पानवठा म्हणजे काय याची माहिती सांगतो.
- पाण्याचे विविध प्रकार प्रयोगाने दाखवतो.
- आपल्याला पाणी कोठून मिळते ते सांगतो.
- गावातील पाण्याच्या सोयी सांगतो पाण्याचा उपयोग कसा करावा याविषयी वर्गात माहिती देतो.
- पाऊस कसा पडतो, याची माहिती सांगतो.
- पारदर्शक, अपारदर्शक पदार्थ ओळखतो.
- आपली हवेची गरज यावर प्रयोग सादर करतो.
- फुगा फुगवण्याची कृती दाखवतो, फुग्यात हवा भरण्याचे प्रात्यक्षिक दाखवतो.
- श्वासोच्छ्वास म्हणजे काय ते सांगतो.
- आपली अन्नाची गरज ओळखतो.
- अन्न म्हणजे काय ते सांगतो.
- अन्नातील विविध पदार्थ वर्णन करून सांगतो.
- अन्नपदार्थांची माहिती आहे.
- अन्न कसे तयार होते ते वर्णन करतो.
- आपला आहार कसा असावा याविषयी माहिती सांगतो.
- आहारातील घटकांची नावे सांगतो.
- आहारातील घटक नावे लिहितो.
- उकडून केले जाणारे पदार्थ ओळखतो.
- भाजून तयार होणारे पदार्थ ओळखतो.
- पदार्थांची साठवण कशी करावी याविषयी माहिती देतो.
- विविध पदार्थ स्वतः तयार करतो.
- चुलीचे विविध प्रकार सांगतो.
- शेगडीचे विविध प्रकार ओळखतो.
- आपले शरीर आणि अवयव सांगतो.
- अवयवांची नावे सांगतो.
- पाठ व पाठीचे भाग, पाय व पायाचे भाग नावे सांगतो.
- आपले ज्ञानेन्द्रिय कोणते सांगतो.
- डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा यांचा उपयोग सांगतो लेखन करतो.
- ज्ञानेन्द्रिय म्हणजे काय ते सांगतो.
- किती ज्ञानेन्द्रिय आहेत ते सांगतो.
- स्वतःची निगा कशी राखावी याविषयी स्वच्छतेच्या सवयी वर्णन करतो.
- आपले दात सुंदर दिसावेत यासाठी प्रयत्न करतो.
- रोज अंघोळ करतो शरीर स्वच्छ करतो.
- स्वच्छतेचे महत्व सांगतो.
- हात कसे धुवावे याचे वर्णन करतो.
- माझे कुटुंब आणि घर याविषयी माहिती सांगतो.
- घरातील लोकांची माहिती सांगतो.
- नात्यांची ओळख चांगली आहे.
- माझी शाळा याविषयी माहिती लेखन करतो.
- निबंध लेखन करतो, माझी शाळा यावर आधारित गोष्ट लिहितो.
- समूहात आपण राहतो याविषयी माहिती सांगतो.
- आपले मित्र आपले खेळ याविषयी माहिती सांगतो.
- खेळांची नावे सांगतो खेळताना विविध योग्य कृती करतो.
- आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सार्वजनिक व्यवस्था त्यांची नावे सांगतो.
- सार्वजनिक सुविधांचे योग्य पालन करतो.
- सार्वजनिक सुविधा योग्य प्रकारे वापरतो.
- आपल्या गरजा कोणत्या हे ओळखतो.
- गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोण मदत करते त्यांच्याविषयी आदर ठेवतो.
- शरीराची वाढ कशी होते याविषयी माहिती सांगतो.
- आपले कपडे कसे असावेत ते सांगतो.
- विविध भागातील कपड्यांची रचना चित्रावरून ओळखतो.
- कपडे स्वच्छ व नीटनेटके ठेवतो.
- कपड्यांचा वापर योग्य करतो.
- कपड्यांचे विविध प्रकार व त्यांची नावे सांगतो.
- विविध हवामानामध्ये योग्य प्रकारे कपडे वापरतो.
- आपल्या अवतीभवती कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांची नावे सांगतो.
- शेती विषयी माहिती सांगतो.
कला
- 1. पाटीवर आकार काढतो.
- 2. अलंकारिक आकार काढतो.
- 3. रेखाटन करतो.
- 4. रंगांची नावे सांगतो.
- 5. वाद्यांची नावे सांगतो.
- 6. चित्रात योग्य प्रकारे रंग भरतो.
- 7. मातीच्या वस्तू बनवतो.
- 8. कविता गायन करतो.
- 9. बडबड गीतांचे गायन करतो.
- 10. आवडत्या प्राण्याचा आवाज काढून दाखवतो.
- 11. पक्षांचा आवाज काढून दाखवतो.
- 12. बोधकथा सांगतो.
- 13. प्राण्यांच्या हालचाली ची कृती करतो.
- 14. अलंकारिक आकाराचे रेखाटन करतो.
- 15. फुले, पाने, पक्षी यांचे अलंकारिक आकार काढतो.
- 16. शिल्प कलेमध्ये मातीच्या सुबक वस्तू बनवतो.
- 17. नृत्य कलेमध्ये हाताचे अलंकारिक हावभाव करतो.
- 18. तालात टाळ्या वाजवतो.
- 19. योग्य तालात पायाची हालचाल करतो.
- 20. मूक अभिनय करतो.
- 21. वस्तूंचे आकार ओळखतो, विविध वस्तूंची नावे सांगतो
- 22. समूहनृत्यात सहभाग घेतो.
- कार्यानुभव
- 1. कार्यानुभव उपक्रमांमध्ये सहभाग घेतो.
- 2. वर्गात कार्यानुभव कोपरा बनवला आहेत्यामध्ये उपक्रम सादर करतो .
- 3. परिपाठात सहभाग घेतो.
- 4. पाण्याचे महत्व जाणतो.
- 5. बियांचा संग्रह करतो.
- 6. सोप्या पद्धतीने कागदाच्या घड्या घालतो.
- 7. कागद काम करतो, कागदापासून विविध वस्तू बनवतो.
- 8. बागेला पाणी देण्याच्या कृतीत सहभाग घेतो.
- 9. मैदानाची स्वच्छता करण्यात सहभाग घेतो.
- 10. वर्ग टापटीप ठेवतो.
- 11. स्वच्छतेच्या सवयी सांगतो.
- 12. दप्तर टापटीप ठेवतो, नियमित शाळेला येतो.
- 13. वर्गात वेळेत उपस्थित राहतो.
- 14. टाकाऊ वस्तु पासून विविध वस्तू बनवतो.
- 15. विविध आकारच्या पताका कापतो.
- 16. मातीच्या सुबक वस्तू बनवतो.
- 17. परस बागेची निगा ठेवतो.
- 18. बागेला पाणी देतो, पाण्याची बचत करतो.
- 19. सुईत दोरा ओवण्याची कृती करतो.
- 20. पतंग बनवतो, रिकाम्या खोक्यापासून शोभेच्या वस्तू बनवतो.
- 21. विविध वस्तूंचे कोलाजकाम बनवतो.
- 22. तिकिटे, शिंपले, रंगीत खडे यांचा संग्रह करतो.
- 23. बोधकथा सादर करतो.
शारीरिक शिक्षण
- 1. हात फिरवणे, हात व पाय यांच्या हालचाली करतो.
- 2. चेंडू झेलने, चेंडू फेकणे इत्यादी क्रिया करतो.
- 3. जाग्यावर उड्या मारण्याचे प्रात्यक्षिक दाखवतो.
- 4. धावणे, उंच उडी, लांब उडी अशासारख्या वैयक्तिक खेळात सहभाग घेतो.
- 5. मैदानी खेळांची आवड आहे.
- 6. खेळांविषयी माहिती सांगतो.
- 7. कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळामध्ये कौशल्य दाखवतो.
- 8. वैयक्तिक खेळांमध्ये कौशल्य दाखवतो.
- 9. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतो.
- 10. योग्य प्रकारे शारीरिक हालचाली करतो.
- 11. हात आणि पायाचे व्यायाम करतो.
- 12. घरातील कष्टाची कामे करतो.
- 13. शाळेत कष्टाची कामे करतो.
- 14. द्वंद्व युक्त खेळामध्ये सहभाग घेतो.
- 15. मैदानावर खिलाडूवृत्ती दाखवतो.
- 16. मैदानी खेळात सहभाग घेतो.
- 17. योग, प्राणायाम करतो. योगाचे विविध प्रकार सादर करतो.
- 18. दोरी उड्या मारणे, लंगडी खेळणे इत्यादी खेळात सहभाग घेतो.
- 19. सहकारी खेळाडूंबरोबर मिळून मिसळून वागतो.
- 20. खेळांमध्ये सहकार्याची भावना ठेवतो.
विशेष प्रगती
- इंग्रजी स्पेलिंग सांगतो.
- स्पेलिंग पाठांतर करतो.
- हस्ताक्षर वळणदार काढतो
- प्रकट वाचन चांगले करतो.
- मौन वाचन करतो.
- स्वतः बोधकथेच लेखन करतो.
- आपले अनुभव कथन करतो.
- अवांतर वाचन करून वर्गात सादर करतो.
- गणिती क्रिया अचूक करतो.
- तोंडी हिशेब करतो
- पाढे पाठांतर चांगले करतो.
- कूट प्रश्न सोडवतो.
- घटकावर सत्ता प्रश्न तयार करतो.
- विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतो.
- कौशल्य दाखवतो.
- वक्तृत्व चांगले आहे.
- कथाकथन करतो.
- दिलेल्या विषयावर चित्र काढतो.
- हस्ताक्षर वळणदार आहे.
- हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कौशल्य दाखवतो.
- स्पर्धा परीक्षांची तयारी चांगली.
- विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवतो.
- शिष्यवृत्तीधारक झाला आहे.
- प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये चांगल्या गुणांनी पास झाला आहे.
- सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग दर्शवतो.
- वैयक्तिक स्वच्छता उत्तम ठेवतो.
- स्वच्छतेविषयी जागरूक आहे.
- पाण्याचा काटकसरीने वापर करतो.
आवड व छंद
- आवड व छंद
- चित्रकला चांगली.
- गायन, वादन, नृत्य करतो.
- पोहण्याची आवड आहे.
- संग्रह वृत्ती.
- सायकल चालवणे.
- धावणे.
- तबलावादन.
- हार्मोनियम वादन.
- हलगी वादन.
- पुस्तक वाचन.
- वर्तमानपत्र संग्रह.
- मातीच्या वस्तू बनवणे.
- विविध तोरणे तयार करणे.
- मंदिरात पूजा बांधणे.
- स्वच्छता करणे.
- लाकडी वस्तू बनवणे.
- खेळणी तयार करणे.
- वैज्ञानिक उपकरण तयार करणे.
- कथालेखन करणे, कविता लेखन करणे.
- कादंबरी लेखन करणे.
- तिकिटे जमवणे.
- पाळीव प्राणी पाळणे.
- प्राण्यांची निगा राखणे.
- फुलांचा संग्रह करणे.
- अलंकारिक वस्तू जमवणे.
- फिरायला जाणे पर्यटन करणे.
- फोटो ग्राफी करणे.
- व्हिडिओ ग्राफी करणे.
- ऑनलाइन लेखन करणे.
- संगणकावर सॉफ्टवेअर तयार करणे.
- युट्युब वर व्हिडिओ तयार करणे.
- शेतीची कामे करणे.
- विविध पदार्थ बनवणे.
- कापडी पिशव्या बनवणे.
- कागदी पिशव्या बनवणे.
- बेकरीचे पदार्थ बनवणे.
- विविध खेळ खेळणे.
- संगणकावर कोडींग करणे.
- online गेम तयार करणे.
आवश्यक सुधारणा
- वेळेवर अभ्यास पूर्ण करणे.
- दिलेला अभ्यास वेळेत करणे.
- अक्षरलेखन सुधारणा करणे.
- अक्षर वळणदार काढणे.
- तोंडी प्रश्नांची उत्तरे देता येणे, चढउतारा सह वाचन करता येणे.
- इयत्तेनुसार इंग्रजी वाचन करता येणे.
- कविता गायन करता येणे.
- हावभाव युक्त वाचन करता येणे.
- करणे दररोज शाळेला येणे.
- वैयक्तिक स्वच्छता रोज ठेवणे.
- शाळेतील उपक्रमात सहभाग घेणे.
- इतरांना मदत करणे.
- झाडांची लागवड करणे.
- मौन वाचन करता येणे.
- दीर्घोत्तरी प्रश्न लिहिता येणे.
- कारणे द्या अशा प्रकारचे प्रश्न सोडवणे.
- लक्षपूर्वक ऐकणे.
- मोठ्या माणसांचा आदर करणे.
- इंग्रजी लेखन करता येणे.
- श्रुत लेखन अचूक करणे.
- गणिती क्रिया अचूक करणे.
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करता येणे.
- सारांश लेखन करता येणे.
- सारांश सांगता येणे.
- शाब्दिक उदाहरणे सोडवता येणे.
- खेळ खेळात आवडीने सहभागी होणे.
- खेळताना सर्वांना सांभाळून घेणे.
- खेळाचा सराव करणे.
- वाचनाचा सराव करणे.
- नम्रतेने वागणे.
- शाळेच्या साफसफाई मध्ये सहभागी होणे.
- विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेणे.
- स्पर्धेमध्ये कौशल्य दाखवणे.
- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे.
व्यक्तिमत्व गुण विकास
- शांत आहे.
- स्थिर आहे.
- सर्वांशी मिसळून वागतो.
- मनमिळावू स्वभाव.
- नम्र स्वभाव.
- सर्वांशी प्रेमाने वागतो.
- सर्वांना मदत करतो.
- खेळात खेळकर वृत्ती दाखवतो.
- अभ्यासू आहे.
- चिकाटीने अभ्यास करतो.
- जिज्ञासू आहे.
- एखादे काम जिद्दीने पूर्ण करतो.
- नेतृत्व गुण आहे.
- समूहाचे नेतृत्व करतो.
- सर्वांना सांभाळून घेतो.
- सर्व उपक्रमात सहभागी होतो.
- प्रामाणिक आहे.
- प्रेमळ आहे.
- आज्ञाधारक आहे.
- मनमिळावू आहे.
- प्रज्ञावान आहे.
- बोलका आहे.
- अबोल असतो.
- सहकार्य वृत्ती चांगली.
- खिलाडू वृत्ती दिसून येते.
- सौजन्यशील आहे.
- हजरजबाबी आहे.
- थोडा चिडखोर स्वभाव दिसतो.
- भूतदया दाखवतो.
- प्राण्यांच्यावर प्रेम करतो.
- थोडा अस्थिर आहे.
- स्थिर आहे.
- कार्यतत्पर आहे.
- सहकार्य वृत्ती चांगली.
- थोडासा बुजरा दिसून येतो.
- उत्साही आहे.
- चंचल आहे.
No comments:
Post a Comment
Thanks lot for your loveable comment plz follow and share