भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री
माझ्या सर्व बालमित्रांना माझा नमस्कार आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती बरोबरच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती आपण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी करतो.
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म सध्याच्या अलाहाबाद या शहरांमध्ये झाला लहानपणापासून लालबहादूर शास्त्री यांना शिक्षण व देशसेवेची आवड होती. त्यांचे वडील शिक्षक असल्या मुळे त्यांना शिकण्याची देखील खूप आवड होती. परंतु लहान वयात वडिलांचे छत्र हरवल्या मुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोळी झाले. त्यांनी काशी विश्वविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. तेथेच त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली.
त्यांचे मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव असे होते परंतु; त्यांनी आपले आडनाव शास्त्री असे ठेवले. तेंव्हा पासून ते लोकांचे लालबहाद्दूर शास्त्री झाले.समाजसेवेची आवड असल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या विचाराने ते मार्गक्रमणा करू लागले. सत्य, प्रेम आणि अहिंसा यांचे ते पाईक झाले. काँग्रेस चे काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. भारत छोडो या आंदोलनामध्ये लालबहादूर शास्त्री यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी 'करो या मरो' या गांधीजींच्या घोषणेला 'करो या मारो' असे क्रांतिकारी रूप दिले. त्यामुळे त्यांना भूमिगत राहावे लागले. इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला देखील चालवला. त्यांना तुरुंगवास ही भोगाव लागला. नंतर पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याबरोबर त्यांचे विचार जुळले आणि नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना गृहमंत्री म्हणून नेमले.
पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर 1964 मध्ये ते भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. त्यांच्याच कार्यकाळात 1966 च्या पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी आपल्या चांगल्या नेतृत्व गुणांची देशवासीयांना प्रचिती आणून दिली. 'जय जवान जय किसान' अशी घोषणा देऊन देशप्रेमाची जागृती निर्माण केली आणि त्यामुळेच देशातील लोक संघटित झाले सैनिकांच्या मध्ये धाडस निर्माण होऊन, भारताने पाकिस्तान बरोबरचे युद्ध जिंकले. नुसते युद्ध जिंकले नाही तर; पाकिस्तान ची राजधानी लाहोर पर्यंतचा भूभाग जिंकून आपल्या ताब्यात घेतला होता. पाकिस्तान बरोबरच्या युद्धात त्यांनी दाखवलेले धाडस व नेतृत्व मान्य करून भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी नमन
No comments:
Post a Comment
Thanks lot for your loveable comment plz follow and share