स्वाध्याय
प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले ?
उत्तर – सेनापती बापट यांना गावकऱ्यांनी विचारले कि तुम्ही शिकलेले असून देखील हे स्वच्छतेच हलकं काम का करत आहात त्यावेळी बापट म्हणाले कि सफाई करणे यात वाईट काहीच नाही. जगात कोणतेच काम हलकं नसतं. म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले.
(आ) भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे?
उत्तर- वस्तू ‘माझी’ असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो, तितकी आपली म्हंटल्यावर घेतोच असं नाही. भारत माझा देश म्हटल्यावर आपण आपल्या देशाची जास्त काळजी घेऊ म्हणून, या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे.
(इ ) तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला?
उत्तर- तात्या स्वच्छता हाच परमेश्वर मानून हातात झाडू घेऊन स्वच्छता करत राहिले. या कृतीमुळे अस्वच्छता आणि सफाईचे काम कमी मानण्याच्या लोकांच्या वृत्तीत बदल होत गेला.
(ई ) थोर व्यक्ती आपल्याला कशाप्रकारे शिकवण घालून देतात?
उत्तर- थोर व्यक्ती उपदेश न करता स्वतः चांगले काम करतात आणि लोकांना आपल्या कामातून शिकवण घालून देतात.
प्रश्न 2. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
(अ) तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा राबवता?
उत्तर- शाळेमध्ये प्रार्थनेच्या आधी स्वच्छता करतोच पण; ज्यावेळी स्वातंत्र्यदिन व 26 जानेवारी असते तेंव्हा त्याचबरोबर गांधी जयंती, टिळक पुण्यतिथी, हात धुवा दिन असे दिन साजरे करतो तेंव्हा सुद्धा आम्ही स्वच्छता मोहीम राबवतो.
(आ)जेव्हा शाळेत तुम्ही स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशाकशाची ची सफाई करता? का?
उत्तर- जेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो तेव्हा प्रथम संपूर्ण इमारतीची स्वच्छता करतो. मग शाळेसमोरील मैदान आणि शाळेतील सर्व स्वच्छतागृहे, ग्रंथालय आणि जेवण खोली या सर्वांची स्वच्छता करून घेतो. ग्रंथालयाची आणि प्रयोग शाळेची स्वच्छता करत असताना काळजीपूर्वक केली जाते पुस्तकांना वाळवी लागू नये तसेच वस्तू गंजू नयेत याची खबरदारी घेतो. पाण्याच्या टाक्यात आली होऊन आजार होऊ नयेत म्हणून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करतो
इ ) तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही
तुम्ही त्याला स्वच्छतेचे कसे महत्त्व पटवून द्याल ते आठ-दहा ओळीत लिहा
उत्तर- सेनापती बापट म्हणतात की देवाची पूजा करून आपण जसे देवाला स्वच्छ करतो आणि देव आपल्याला प्रसन्न होतो अगदी तशीच आपण परिसराची स्वच्छता केली पाहिजे. स्वच्छता हाच परमेश्वर मानून आपण आपला परिसर नेहमी स्वच्छ व टापटीप कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आपला परिसर जर स्वच्छ असेल तर आपल्याला कोणतेही आजार होऊ शकत नाहीत. आपले आरोग्य उत्तम राहते, त्याच बरोबर परिसरातील वातावरण देखील प्रदूषण मुक्त होते. म्हणून नेहमी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
ई ) आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा
उत्तर- आपल्या देशातील सर्वच गोष्टी ह्या आपल्या स्वतःच्या आहेत माझा भारत देश म्हणून भारतातील सर्व गोष्टी वस्तू ह्या माझ्याच आहेत. मग भारतातील सार्वजनिक बस, विजेच्या खांबावरील दिवे देशातील नद्या, देशातील रस्ते, सरकारी इमारती, देशातील सर्व शाळा, कार्यालय ह्या सर्व माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत.
👑🥳🥳🥳🥳🙏
ReplyDeleteHii
DeleteHiiiii
ReplyDeleteYour link is so useful ☺️☺️☺️☺️☺️☺️ I like your answers ☺️☺️☺️☺️ thank you ☺️☺️☺️☺️☺️
ReplyDelete