जनाई स्वाध्याय

 

पाठ क्र जनाई

स्वाध्याय

प्रश्न - एका वाक्यात उत्तरे लिहा

      ( ) जनाई ऊसाच्या फडात कोणते काम करत होती ?

उत्तर -  जनाई ऊसाच्या फडात पाण्याची दार मोडत होती म्हणजेच पाटाचे पाण्याचा प्रवाह बदलत होती.

       ( ) शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले ?

उत्तरशेंगांच्या वावरातून जाताना जनाईला वाटले आकाशातून रौ रौ रौ करत विमान आले आहे.

       ( )  जनाई का घाबरून गेली ?

उत्तरकाळ्या पांढऱ्या ठिपक्यांचा तुळई एवढा साप बघून जनाई पार घाबरून गेली.

       ()  जनाईला शेतात का जावे लागणार होते?

उत्तरशेतात काम करण्यासाठी तिला कोणाचही  पाठबळ नव्हत, सर्व काम तिलाच करावं लागणार होतं म्हणून जनाईला शेतात जावे लागणार होते.


प्रश्न  . खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

  • रात्रंदिवस काम करणेकाबाडकष्ट करणे

       शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतात.

  • धाबे दणाणणे भीती वाटणे

       पोलीसस्टेशन ला नवीन कडक फौजदार आल्याने चोरांचे धाबे दणाणले.

  • पोटात घाबरा पडणेखूप भीती वाटणे

       राहुल च्या मागे बैल लागल्याने त्याच्या पोटात घाबरा पडला.

  • पायाखालची जमीन हादरणे - भीतीने पाय थरथर कापणे.

       जंगलात फिरायला गेलेल्या सुजित ने समोर वाघ पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.


प्र. . पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दांत वर्णन केले आहे. त्यांच्या जोड्या जुळवा.

 '' गट                                             '' गट

() शेंगांचे वावर                (हिरवागार शालू  

           

 () शेंगांना आलेली

      पिवळी फुले                 (हिरव्या-पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल                                                   

() साप         (काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी                    

() जेवण करून पोट भरले   (डर्रकन दोन ढेकर आले         

() जाड धाट                 (मनगटासारखी धाट          


प्र. . तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा.

() पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग - ............

     संध्याकाळी अचानक अंधारून आले, वर पाहतो तर काय आकाशात गडद काळे ढग जमा झाले होते. ढग पाहून वाटत होते की, आत्ता थोड्याच वेळात धो धो पाऊस  येणार.

() पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी - .....

      अचानक आकाश काळवंडून आले आणि जोराचा पाऊस पडला , परत थोड्याच वेळात पाऊस निघून गेला आणि कोवळ उन पडलं . लगेचच समोरच्या तारेवर ओळीत पक्षी एका सरळ रेषेत बसले होते जणू पक्ष्यांची शाळाच भरली होती .

 () फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे

      जवळच फुलांचे शेत बहरले होते. झेंडू, गुलाब, मोगरा अशी विविध फुले फुललेली होती. पाहायला खूप छान वाटत होत. जणू दिवसा आकाशातून रंगिबेरंगी  चांदण्या जमिनीवर उतरल्या आहेत .

      () गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओळी - ...

       गुरुजींनी वर्गात आल्याआल्या फळ्यावर नेहमी खरे बोलावे, असा सुंदर अक्षरात सुविचार लिहिला, मी सुद्धा तसाच सुंदर अक्षरात वहीत लिहिला.

 

 

2 comments:

Thanks lot for your loveable comment plz follow and share