इयत्ता ५ वि.
पाठ – अरण्यलिपी
स्वाध्याय
प्रश्न १ ) एका वाक्यात उत्तरे लिहा
(अ ) अरण्यलिपी म्हणजे काय ?
उत्तर – जंगलात प्राण्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात यालाच वन्यप्राण्यांची अरण्यलिपी म्हणतात.
(आ) वाघांची गणती कशावरून केली जाते ?
उत्तर – वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते.
(इ) जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात ?
उत्तर – हरिण , सांबर व काळवीट हे प्राणी मोठ्या आवाजात ओरडून धोक्याची सूचना देतात.
प्रश्न २ ) खालील प्रश्नांची तीन – चार वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) ‘वाघाचे क्षेत्र ‘ कशावरून ओळखता येते ?
उत्तर – वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. तो पाऊलवाटेवरून, नदिनाल्यांच्या पात्रांतून, वाळूवरून चालतो. ओल्या वाळूत मातीत वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले की समजावे ते वाघाचे क्षेत्र आहे.
(आ) ‘वाघ – वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो ?
उत्तर – वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पायांत फरक असतो. वाघाचा पंजा चौकोनी असतो. लांबी – रुंदी सारखी असते; परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो. रुंदिपेक्षा त्याची लांबी जास्त असते.
(इ) शिकार झालेला प्राणी कोणता होता, हे कशावरून ओळखता येते ?
उत्तर – काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग- जसे केस , नखे व हाडे आढळून येतात. त्या निरीक्षणावरून शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते.
प्रश्न ३ ) तुमच्या शब्दात लिहा.
तुमच्या घरी , शेजारी कोणकोणते प्राणी आहेत , ते कसे चालतात , ते काय खातात तसेच वेगवेगळया प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा. तुमचे अनुभव लिहा किंवा कॉमेंट मध्ये लिहा.
Hi
ReplyDeleteएक दम भारी
ReplyDeleteThank you
ReplyDelete