माळीन गाव घटना स्वाध्याय

 माळीन गाव घटना- स्वाध्याय

पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माळीण गाव. ३० जुलै २०१४ या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे गाव गाडले गेले. त्यात मनुष्यहानी झाली. या बातमीने महाराष्ट्रच नव्हे, तर सगळा देश हळहळला. या घटनेसंदर्भातील वर्तमानपत्रातील बातम्यांच्या शीर्षकांची ही कात्रणे.👇👇👇

वरील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे वाचा प्रश्नांची उत्तरे लिहा

१.वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटने संबंधी आहेत?

उत्तर – बातम्यांची शीर्षके नैसर्गिक आपत्तीविषयी आहेत.

२. माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती?

उत्तर – माळीण गावात ४० ते ५० कुटुंबे राहत होती.

३. कोणत्या संस्थेने या घटनेचा इशारा दिला होता?

उत्तर – नासा या संस्थेने या घटनेचा इशारा दिला होता.

४. मदतीची घोषणा कोणी केली ? कशा स्वरूपात ?

उत्तर – राज्यसरकारने आर्थिक (पैशांच्या) स्वरुपात  मदतीची घोषणा केली आहे

५. ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले?

उत्तर- ढिगाऱ्या खालून आठ जणांना जिवंत काढण्यात आले.

६. ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली?

उत्तर – ढिगाऱ्याखालचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

७. माळीण गावाबाबत दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली?

उत्तर – माळीण गावाबाबत दुर्घटना पावसाळ्यात, ३० जुलै २०१४ रोजी घडली.

८. शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले?

उत्तर – पावसाची संततधार, खंडीत वीजपुरवठा, दुर्गंधी आणि रोगराई या गोष्टींमुळे अडथळे आले.

९. माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली?

उत्तर – माळीण गावातील लोकांना आजूबाजूच्या लोकांनी, एनडीआरएफ तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांनी मदत केली 

विचार करा.शोध घ्या.

१.या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील, असे तुम्हाला वाटते?

उत्तर – या घटनेमागे प्रचंड पाऊस हे नैसर्गिक कारण आहेच त्याचबरोबर निसर्गात मानवी हस्तक्षेप हे महत्वाचे कारण आहे. मानवी हस्तक्षेपामध्ये खाणकाम शेतीसाठी वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण, तसेच लोकसंख्या वाढीमुळे धोकादायक ठिकाणी वास्तव्य अशी बरीच कारणे आहेत.

२. नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते, याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा.

उत्तर – नासा ही संस्था अमेरिकेत वॉशिंग्टन येथे आहे. या संस्थेचा लॉंग फॉर्म नॅशनल एरोनॉटीक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन असा आहे. ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा नील अर्मस्ट्रॉग हा याच संस्थेचा कर्मचारी होता.

३. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील? विचार करा व लिहा.

उत्तर –अशा प्रकारच्या दुर्घटनेत जे जखमी असतात त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यास वेळेवर अँब्युलन्स मिळण्यास अडचण येते, मृत जास्त असतील तर दुर्गंधी पसरते, साथीचे आजार पसरतात,आर्थिक मदत करण्यास अडचण येते. 

४. दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा.

उत्तर- जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करणे. ढिगाऱ्याखालून मृतदेह लवकर बाहेर काढणे. जे जिवंत आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे. अन्नधान्याचा, कपड्यांचा तसेच आर्थिक पुरवठा करणे. अशाप्रकारे मदत करता येईल. 

1 comment:

Thanks lot for your loveable comment plz follow and share