५ वी कारागिरी
स्वाध्याय
प्रश्न १) दोन तीन वाक्यात
उत्तरे लिहा
अ) लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची?
उत्तर- फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की, कुंभाराच्या हाताच्या चपळाईने
लहान - मोठी मातीची भांडी तयार व्हायची याची लेखिकेला फार गंमत वाटायची.
आ)लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची?
उत्तर –मोगा, डेरा, घट, टिंगाणी, गाडगे, शेगड्या, चुली एवढी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची.
इ) लेखिकेचे आजी -आजोबा मातीपासून काय काय बनवायचे?
उत्तर- लेखिकेचे आजी-आजोबा नागपंचमी ला नाग व बेंदूर सणाला बैल माती पासून बनवायचे.
ई) लेखिकेला तासंनतास काय बघत राहावेसे वाटायचे?
उत्तर- सोनेरी नक्षीतला अन् जीगानं चकचकलेल्या शेंडीचा नारळ, लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची
झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला या सर्व गोष्टी लेखिकेला तासंतास पाहत बसावे
असे वाटते.
उ) जीनगारांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का
म्हटले आहे?
उत्तर-जीनगरांचा मामा पाळण्या वरच्या
खेळण्यासाठी राघू- मैना तयार करायचा, त्याच्यावर चंद्र चांदण्यांची शोभा करायचा. या वस्तू अगदी खऱ्या असल्यासारखे
वाटायचे म्हणून जीनगरांचा मामा कसबी माणूस असं लेखिकेने म्हटले आहे.
ऊ) कामट्या पासून काय काय बनवता येते?
उत्तर- रवळ्या, सुपं, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पाळणे, खुर्च्या, टेबलं अशा वस्तू कामट्या पासून बनवता येतात.
ए) चिमा च्या घरी काय काय बनवलेले असायचे?
उत्तर- शिंकी, मुस्की, गोफन, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या अशा विविध वस्तू
चिमा च्या घरी बनवलेल्या असायच्या.
ऐ) शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची?
उत्तर- शिंप्याने आणून
दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी भावल्या, अंगडी, टोपडे, नऊ खणाची चोळी, पायघोळ परकर, मुलांसाठी पांघरून, मोठ्यांसाठी वाकळ तयार करायची.
ओ) माहेरवाशिणी चा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा?
उत्तर- लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी, बारशाच्या वेळी कुंची आशा आजीने शिवलेल्या वस्तू माहेरवाशिण सासरी घेऊन जायची त्या
वस्तू पाहून माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा.
प्रश्न २. कोणाला व का म्हटले आहे ते लिहा
१)निर्मितीचा धनी-
निर्मितीचा धनी असं कुंभाराला म्हटलं आहे. कारण कुंभार चिखलातून
किंवा माती पासून विविध कलात्मक वस्तू तयार करतो आणि मातीला सुंदर आकार देतो म्हणून कुंभाराला
निर्मितीचा धनी असे म्हटले आहे.
२)भुईफुले-
भुईफुले असं दारात काढलेल्या
टिपक्यांच्या रांगोळीला म्हटलं आहे. कारण ठिपक्यांच्या रांगोळी मधून काढलेल्या फुलात
जेव्हा रंग भरले जायचे तेव्हा जणू जमिनीतूनच फुल उगवलं आहे असं वाटायचं, इतकी ती सुंदर रांगोळी असायची
म्हणूनच रांगोळीला भूईफुले असं म्हटलं आहे.
प्रश्न 3. खालील
शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अ) तहान भूक हरपणे - तहानभूक विसरून जाणे
पीक चांगले येण्यासाठी शेतकरी शेतात तहानभूक
हरपून काम करतो.
आ) वाहवा मांडणे- स्तुती करणे
काकीने दारात काढलेले रांगोळी बघून सर्वजण
वाहवा मांडत होते.
इ)तोंडावर हसू फुटणे – मनात
आनंद वाटणे.
आपल्या मुलग्याचा रुबाब पाहून सर्व आईच्या
तोंडावर हसू फुटले.
ई)ऐटी मिरवणे – रुबाब
दाखवणे.
-नुपूर नवीन ड्रेस घालून ऐटी मिरवत होती.
उ) हेवा करणे – असूया किंवा
मत्सर वाटणे.
-साहिलने दररोज पेपर वाटण्याचे काम करत अभ्यास
करून परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून सर्वांना त्याचा हेवा वाटत होता.
ऊ)तोंडात बोट घालणे –
आश्चर्य वाटणे.
-आपल्या पप्पांनी सायकल भेट आणलेली पाहून रुद्र
ने तोंडात बोट घातले.
वाचा
या पाठात तोंड या अवयवावर दोन शब्द समूह आले
आहेत. जसे तोंडावर हसू फुटणे, तोंडात बोट घालणे. तोंड- या अवयवावर आणखी बरेच वाक्प्रचार
शब्दसमूह आहेत.
उदा. तोंड देणे, तोंड फिरवणे, तोंडघशी पडणे, तोंडदेखले बोलणे, तोंड चुकवणे, तोंडचे पाणी पळणे, तोंडात मारल्यासारखे होणे, तोंडी लागणे ईत्यादी.
खालील अवयवाशी संबंधित शब्द
समूह व वाक्प्रचार संग्रहित करा.
१)कान
कान उघडणी करणे, कान उपटणे, कान कापणे, कान टोचणे, कान पिळणे, कान दुखणे, कानाने हलका असणे, कानामागे टाकणे, कानाला खडा लावणे, कानावर हात ठेवणे, कानावर घालणे, कानावर येणे, कानीकपाळी ओरडून सांगणे ई.
२)डोळा-
-- डोळ्यांचे पारणे फिटणे, डोळ्यात अंजन घालणे, डोळ्यात खुपणे, डोळ्यांत धूळफेक करणे, डोळ्यातून पाणी काढणे, डोळ्यांवर येणे, डोळ्याला डोळा लागणे, डोळा असणे, डोळा लागणे, डोळे उघडणे, डोळे काळे पांढरे होणे, डोळे मिटणे, डोळे वटारणे, डोळे विस्फारणे, डोळेझाक करणे,
३)नाक-
नाक उडवणे, नाक कापणे, नाक खुपसणे, नाक घासणे,
४)डोके –
डोके घालणे, डोके चालवणे, डोके फिरणे, डोक्यावर खापर फोडणे, डोक्यावर घेणे, डोक्यावर बसवणे.
भरत
ReplyDeleteमाझं
Yankut
ReplyDelete