स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) हिरवे राघू कोठे उडत आहेत ?
उत्तर – हिरवे राघू आकाशात उडत आहेत.
(आ) निर्झर कोठून व कसे वाहतात?
उत्तर -निर्झर डोंगरावरून खळखळ वाहत आहेत.
इ) चित्रातील भिंती कशा तयार होतात ?
उत्तर – नेमक्या सरळ चार रेषा काढल्या की भिंती तयार होतात.
(ई) पाऊलवाटेवरून कोण येते ?
उत्तर – पाऊलवाटेवरून आपले सखेसोबती येतात.
प्र. २. खालील प्रश्नांची उत्तरे
लिहा.
(अ) इंद्रधनुष्यातील रंगांना ‘जादूच्या पेटीतील रंग'
असे का म्हटले आहे ?
उत्तर – इंद्रधनुष्यात सात रंग असतात जेंव्हा ते एकत्र येतात तेंव्हा फक्त
पांढरा एकच रंग दिसतो. आणि पुन्हा पांढऱ्या रंगातून विलग होतात परत पुन्हा ते सात
दिसतात. ही क्रिया एखाद्या जादुसारखी वाटते म्हणून इंद्रधनुष्यातील रंगांना
जादूच्या पेटीतील रंग म्हटले आहे.
(आ) कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच-पाच
गोष्टींची नावे लिहा.
उत्तर – निळा – आकाश, पेन, कपाट, बाटली, शर्ट.
रुपेरी – ढग, समुद्राची वाळू,
सुर्याचे उन्ह,
भांडी, कागद
हिरवा – पोपट, गवत, झाडाची पाने, पिशवी,
फ्रॉक.
तांबडा – सकाळचा सूर्य,
बांगड्या, टोमॅटो,
ड्रेस,
काळा – केस, गॉगल, मोटरसायकल,
कोळसा,
जांभळा –
जांभूळ, गारवेल फुल,
बॅग,खंड्या पक्षी,
प्र. ३. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(अ) आभाळ - आकाश, गगन, अंबर, व्योम
(आ) निर्झर --
झरा,
ओहळ,
(ई) घर --
सदन,
आलय
(इ) राघू -
पोपट,
रावा
(उ) वेल --
लता,
कुंज.
प्र. ४. तुम्हांला कोणत्या रंगाचे कपडे जास्त आवडतात?
ते का आवडतात ते सांगा.
प्र. ६. तुमच्या स्वत:च्या घराचे चित्र काढा. घराचे वर्णन करणारी कविता करा.
उपक्रम :
१. पाऊस पडून गेल्यानंतर कधीकधी आकाशात इंद्रधनुष्य दिसते. त्याचे निरीक्षण
करा. त्याचे चित्र काढा व रंगवा.
२. सकाळी, दुपारी व सायंकाळी आकाशाचे निरीक्षण करा. त्यावेळी आकाशात
दिसणाऱ्या ढगांचे
रंग व आकार लक्षात ठेवा. पाहिलेल्या दृश्याचे वर्णन वर्गात करा.
३. परिसरातील घरे, वनस्पती, पाखरे, प्राणी यांचे निरीक्षण करा. तेथे कोणकोणते रंग वापरले आहेत
ते पाहा. जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या दोन-तीन रंगांची नावे लिहा.
४.परिसरातील घरांच्या खिडक्या, दारे यांचे निरीक्षण करा. त्या तयार करण्यासाठी कोणकोणत्या
वस्तू वापरल्या आहेत, त्यांना कोणकोणते रंग दिलेले आहेत याची माहिती मिळवा.
खेळूया शब्दांशी.
कवितेत 'खिडक्यादारे' हा शब्द आला आहे. याचा अर्थ 'खिडक्या व दारे'
असा होतो.
यासारखे आणखी
शब्द शोधा व लिहा. कवितेत ‘सखेसोबती' हा जोडशब्द आला आहे. सखे
आणि सोबती दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या.
Nice sirji
ReplyDelete