राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली?
उत्तर – शिकारीला गेलेल्या राजाने अहिंसेची म्हणजे कोणालाही इजा न करण्याची शपथ घेतली.
(आ) तुकडोजीमहाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत ?
उत्तर –तुकडोजीमहाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषेतील कवने खंजिरीच्या तालात बेभान होऊन गात असत.
(इ) तुकडोजीमहाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
उत्तर – तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला.
प्र. २. का ते लिहा.
(अ) राजाने शिकार करण्याचे सोडले?
उत्तर – एक राजा जंगलात शिकार करण्यासाठी आला असताना एक मुलगा गुहेच्या समोर ध्यानस्थ बसला होता.जंगली प्राण्यांविषयी त्या राजाने त्या मुलाला विचारले तेंव्हा तो मुलगा म्हणजेच संत तुकडोजी महाराज त्याला म्हणाले , “हे सुखी जीव आनंदाने जंगलात वावरत आहेत. तुम्ही त्यांना का हो ठार करता?” या प्रश्नाचे उत्तर राजाला देता आले नाही म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडून दिले.
(आ) चंद्रपूर जिल्हयातील लोक तुकडोजीमहाराजांना ‘देवबाबा' म्हणत.
उत्तर – खेळणे, पोहणे, व्यायाम करणे, धावणे, घोड्यांवर बैलगाड्यांवर नियंत्रण साधने, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, ढोलाच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केलीच त्याचबरोबर हिंदी , उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे सुद्धा तल्लीन होत असत. या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणत.
(इ) राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजीमहाराजांचा ‘राष्ट्रसंत' पदवीने गौरव केला.
उत्तर - आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. तुकडोजी महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संत तुकडोजीमहाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि 'राष्ट्रसंत' या पदवीने त्यांचा गौरव केला.
प्र. ३. तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा.
(अ) श्री गुरुदेव सेवामंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले ?
उत्तर - श्री गुरुदेव सेवामंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले.
(आ) सानेगुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी काय केले?
उत्तर - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.
(इ) राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले ?
उत्तर - जपानमध्ये 'विश्वशांती परिषद' व 'जागतिक धर्मपरिषद' आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. तेथे अठरा देशांची जागतिक धर्मसंघटना गठित करण्यात आली होती. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
उपक्रम :
'ग्रामगीता' हा ग्रंथ मिळवून वाचा. त्यातील तुम्हांला आवडलेल्या ओव्या परिपाठात वाचून दाखवा.
त्या ओव्या शाळेच्या ‘सामान्यज्ञान' फलकावर लिहा.
👍
ReplyDelete👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😻💯💐🌹👍🌹💐💯😻👍🌹💐💯😻👍🌹💐💯😻
Deleteतुमचा तीन पानांची उत्तरे चुकली आहे
ReplyDelete😀😀💐💐👍👍🎉⭐⭐👏👏
ReplyDeleteSh
ReplyDeleteश्री
ReplyDeleteश्री
ReplyDelete