Saturday, 28 September 2024

महात्मा गांधी भाषण

 



राष्ट्रपिता महात्मा गांधी

 
      2 ऑक्टोंबर या दिवशी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते.

     विविध प्रांत, भाषा, वर्ण, वंश यांनी नटलेल्या भारत देशावर सुमारे साडेतीनशे वर्षे इंग्रजांनी जुलमी राज्य केले. आपल्या भारतभूमीला गुलाम बनवले. याच्या विरोधात मोठ्या हिमतीने आव्हान जर कोणी दिले असेल तर; ते होते भारताचे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी.

   आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात काठी आणि बंदुकीचा वापर नाही केला. त्यांनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तीन तत्वांचा अवलंब केला. यांच्या जोरावरच त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींना माहित होते इंग्रजांच्या शस्त्रा पुढे निशस्त्र शेतकऱ्यांचा कधीच टिकाव लागणार नाही. यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर त्यांना व त्यांच्या धोरणांना विरोधच केला पाहिजे, म्हणून त्यांनी सत्याग्रह आणि असहकाराची आंदोलने उभी केली.

      त्यांनी केलेला सगळ्यात पहिला सत्याग्रह म्हणजेच चंपारण व खेडा सत्याग्रह. त्याकाळी इंग्रज... शेतकऱ्यांवर जबरदस्तीने कर आकारणी करत असत. इंग्रज जे सांगतील तेच पीक शेतकऱ्यांनी पिकवायचे असा दंडक असायचा. या जाचाला शेतकरी कंटाळले होते. त्यातच दुष्काळ आणि अवर्षण याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते. अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. यातून या जाचातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी कंबर कसली. चंपारण व खेडा येथे निळ पिकवण्याच्या अन्यायकारी निर्णयाविरोधात पहिला सत्याग्रह घडवून आणला. सर्व शेतकऱ्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देऊन निळ पिकवण्यावर बहिष्कार घातला. शेतकऱ्यांची ही एकी पाहून इंग्रजांनी आपली सक्ती मागे घेतली. इथून पुढे गांधीजींनी हेच आपले समाजसेवेचे व लोक हिताचे कर्तव्य मानून, शास्त्र समजून देश सेवेसाठी सर्वस्व वेचले अशा या महात्म्यास माझा शतशः प्रणाम....

No comments:

Post a Comment

Thanks lot for your loveable comment plz follow and share